संविधान दिन आणि २६/११ हल्ल्यातील शहिदांना अभिवादन म्हणून सालेकसा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
मायकल मेश्राम गोंदिया, ता. २६ नोव्हेंबर:
संविधान दिन व मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी, आणि नागरिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज सालेकसा पोलीस ठाण्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे आयोजन गोंदिया जिल्हा पोलीस दल, कल्पतरु बहुउद्देशीय संस्था, लोकमान्य ब्लड सेंटर गोंदिया आणि एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.रक्तदान शिबिरास सकाळी ९ वाजता सुरुवात झाली आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण ८२ पोलीस अधिकारी, कर्मचारी, आणि नागरिकांनी रक्तदान केले.सदर शिबिरामध्ये मा. पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, आणि आमगाव पोलीस उपविभागीय अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी, आमगाव व सालेकसा पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमात रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थित अधिकारी व आयोजकांनी जनतेस नियमित रक्तदान करण्याचे आवाहन केले. या उपक्रमामुळे संविधान दिनाचे महत्त्व अधोरेखित झाले असून, शहिदांच्या बलिदानाला अभिवादन करण्याचा हा अनोखा उपक्रम ठरला.