"गरुटोल्यात अवैध धंद्यांना पोलिसांचा पाठिंबा? पत्रकार परिषदेत खळबळजनक आरोप!"

 


गावकऱ्यांनी केलेल्या तक्रारीला पोलिसांचा ठेंगा

व्यसनापाई गावात वाढले प्रकरण


माईकल मेश्राम सालेकसा   राज्यात अवैध धंद्यांना मात देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे मात्र कुठेतरी प्रशासनाची अवैध धंद्यांना वाव देत असल्याची घटना समोर आली आहे ती म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात अंतर्गत गरूटोला गावांमध्ये अशी घटना घडवून आली. मागील तीन ते चार वर्षापासून या गावात अवैध दारू विक्रीच्या प्रकरण सुरू आहे. या अवैध धंद्याला बंद करण्यासाठी येथील गावकऱ्यांनी, महिलांनी एक वर्षापूर्वी स्थानिक पोलीस स्टेशन सालेकसा येथे तक्रार केली असूनही या ठिकाणी सुरू असलेला अवैध धंदा जोमात सुरू आहे. या अवैध धंद्याला हि स्थानिक पोलीस प्रशासन पाठबळ देत असल्याचे आरोप स्थानिक नागरिकांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे. 

गरुटोला या गावी दोन दिवसांपूर्वी घडलेली घटनेमुळे या गावातील नागरिकांमध्ये प्रशासना विरोधात चांगलाच रोज व्याप्त झाला आहे. या घटनेला बघून स्थानिक नागरिकांनी गावातच पत्रकार परिषद आयोजित केली असून या माध्यमातून स्थानिक पोलीस प्रशासनाला ठळक जबाबदार असल्याचे बोलले आहे. अवैध धंद्या विषयी तक्रार केली असता त्या तक्रारीवर प्रशासन कारवाही का करत नाही ? गरुटोला येथील अवैध दारू विक्रेता अमृतलाल ब्रिजलाल उपराडे वय 55 वर्ष हे मागील तीन ते चार वर्षापासून गावात अवैध दारू विक्री करत आहेत. गाव व्यसनमुक्त व्हावा आणि गावातील दारूबंदी व्हावी याकरिता यांच्याविरुद्ध तक्रार केली असूनही अवैध दारू विक्रेता मोकाटपणे आपला व्यवसाय करत आहे. यावर स्थानिक पोलीस प्रशासन मात्र डोळे बंद करून अवैध धंद्यांना आशीर्वाद देत आहेत. असाही आरोप येथील नागरिकांनी केला. गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे येथील युवक व्यसनापायी दुर्घटनेचे बळी पडत आहेत. नुकताच झालेला प्रकरणात घोंसी येथील मृतक विजय रमेश गजबे वय 32 वर्ष यांची सुद्धा अधिक व्यसन केल्याने ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. अशा घटना गावात अनेकांसोबत घडल्या आहेत. या क्षेत्रात असलेले ग्रामपंचायत नानव्हा ,बिंजली,खोलगढ परिसरात व्यसनामुळे दुष्परिणाम होत आहेत. गावकऱ्यांनी शेवटी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितले की तत्काळ अवैध धंद्या ला बंद करून दोषीवर कारवाई करण्यात यावी. अन्यथा येथील नागरिक प्रशासना विरोधात मोठे पाऊल उचलणार असेही ते यावेळी बोलले. 

पुष्पा महेश चौधरी महिला प्रतिनिधी गरुटोला - एक वर्षापूर्वी अवैध दारू विक्री बंद व्हावी यासाठी गावातील महिला संघटनाद्वारे पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असूनही स्थानिक पोलीस प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केली नाही ही मोठी सालेकसा पोलीसांची चूक आहे.


 

गौरीशंकर बिसेन सरपंच ,नानव्हा - गावात सुरू असलेल्या अवैध धंद्याला स्थानिक पोलीस प्रशासन पाठबळ देत आहे. त्यावर कोणतीही कारवाई न करणे व व दिलेल्या तक्रारीला दुर्लक्ष करणे हे चुकीचे आहे. 

 वनिता परसमोडे ग्राम पंचायत सदस्य - गावातील महिला दारूबंदीसाठी पुढाकार घेत असताना अवैधंदे करीत असलेला व्यक्ती महिलांना धमकावतात तुम्ही स्वाक्षरी काऊन करता असेही ते बोलतात


 रमेश हरिचंद गजबे मृतकाचे वडील - गावात सुरू असलेली अवैध दारू विक्री त्वरित बंद करण्यात यावी. यामुळे गावात अनेक युवक व्यसनी होत आहेत आणि यामध्ये माझा ही मुलगा बळी पडला.


 

Post a Comment

Previous Post Next Post