गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये स्नेह संमेलन उत्साहात संपन्न
आमगाव –गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे संचालक आणि प्राचार्य राजेंद्र सोनवाने यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून सौ. नेहा राजेंद्र सोनवाने उपस्थित होत्या. कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी फुलांची सजावट, विविध खेळ, क्रिकेट, कबड्डी, रांगोळी स्पर्धा तसेच शारीरिक उत्साहवर्धक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या कार्यक्रमाला पालकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आणि त्यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरुकुल पब्लिक स्कूलमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केले. या यशस्वी आयोजनासाठी देवांगना ठाकूर, सरिता कटरे, प्रेमलता कावडे, प्रविण तुरकर, रमेश ठाकूर, प्रमोद बीसेन, भारती लोहार, वर्षा रहागडाले, स्वाती गुडेया, प्राची चौरे, ज्योती रक्तसीगे, मीनाक्षी पटले, प्रियंका मडावी, रुहांजनी उके, कविता पागोंटे, नाजुल बागडे, कावेरी धाटकर, प्रीती भेलावे, पिंकी चुटे, समिता मेश्राम, लता भ्रगलासतव, आरती शेंदरे, रीता गायधने, अंजू चुटे, खेमू पाथोडे, रंजना किरमोरे, दुर्गा सवालाखे, श्रीमती पटले आणि विकास टेम्भरे यांनी विशेष योगदान दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका दुर्गा बाविस्कर आणि पल्लवी बीसेन यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रमोद बीसेन यांनी मानले. या संमेलनाने विद्यार्थ्यांसोबतच पालक व शिक्षकांमध्ये एक वेगळा संवाद आणि स्नेह वाढीस
लावला.