भारतीय स्टेट बँक, आमगाव शाखेत "अन्नदाता दिवस" उत्साहात साजरा



भारतीय स्टेट बँक, आमगाव शाखेत "अन्नदाता दिवस" उत्साहात साजरा


आमगाव: AMGAON भारतीय स्टेट बँक, आमगाव शाखेच्या वतीने "अन्नदाता दिवस" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आमगाव शाखा ही एक कृषी व्यावसायिक शाखा (Agriculture Commercial Branch) असल्यामुळे शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन विविध उपक्रम राबवले जातात. या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये यशस्वी शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार मोनिका कांबळे होत्या. या वेळी बोलताना त्यांनी सांगितले की, "शेतकऱ्यांसाठी तहसील कार्यालयाकडून जे काही शक्य असेल ते करण्यात येईल. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी शेतकऱ्यांनी आपले प्रयत्न अधिक सक्षम करावेत."कार्यक्रमात भारतीय स्टेट बँक, आमगाव शाखेचे व्यवस्थापक भास्कर चाचरकर यांनी बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली. त्यांनी शेतकऱ्यांसाठी विशेषतः कृषी कर्ज व तंत्रज्ञानावर आधारित सल्लामसलत याबाबत चर्चा केली.

आरबीओ (Regional Business Office) विभागाचे प्रमुख विलास सोनटक्के यांनीही कार्यक्रमाला मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, "बँक आणि शेतकऱ्यांमध्ये सुसंवाद निर्माण करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत."कार्यक्रमाला वरिष्ठ पत्रकार धनराज भगत यांचीही उपस्थिती होती. त्यांनी शेतकऱ्यांसमोर देशातील कृषी धोरणांवर मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमामध्ये यशस्वी शेतकऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये उत्तम पिकवाट, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, तसेच आर्थिक प्रगतीसाठी केलेल्या विशेष योगदानासाठी शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. शेतकरी रवी शेंडे, अनिल उरकुडे, आणि सुमती पाटील यांचा सत्कार करून त्यांच्या यशोगाथा समोर आणल्या गेल्या.शेतकऱ्यांनीही बँकेच्या उपक्रमांचे कौतुक केले आणि भविष्यात बँकेकडून अधिक मदतीची अपेक्षा व्यक्त केली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. हा उपक्रम शेतकरी बांधवांसाठी प्रेरणादायी ठरला.

Post a Comment

Previous Post Next Post