जिल्हा परिषद वरिष्ठ केंद्रीय प्राथमिक शाळा तिरखेडी येथे शालेय वार्षिक स्नेहसंमेलन आगाज 2025 यशस्वीपणे पार पडले ..
दिनांक 25 व 26 जानेवारी 2025 ला जिल्हा परिषद वरिष्ठ केंद्रीय प्राथमिक शाळा तिरखेडीच्या भव्य पटांगणावर शालेय वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वीपणे घेण्यात आले . या कार्यक्रमाच्या उद्घाटक मान.सौ प्रमिलाताई गणवीर माजी सभापती पंचायत समिती सालेकसा तसेच अध्यक्ष माननीय सौ विमलताई बबलूजी कटरे सदस्य जिल्हा परिषद गोंदिया .दीप प्रज्वलक म्हणून वीणाताई कटरे सभापती पंचायत समिती सालेकसा तसेच सौ प्रियाताई शरणागत सरपंच ग्रामपंचायत तीरखेडी तसेच सौ रेखाताई फुंडे, सदस्य पंचायत समिती सालेकसा तसेच माननीय भूषणजी बुराडे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सालेकसा सोबत विशेष अतिथी माननीय व्ही एस डोंगरे सर गटशिक्षणाधिका री पंचायत समिती सालेकसा माननीय एम एल मेश्राम वरिष्ठ विस्तार अधिकारी पंचायत समिती सालेकसा कुमारी एस एस पाचे केंद्रप्रमुख तिरखेडी केंद्र. तसेच सत्कारमूर्ती माननीय एस जी जोगी केंद्रप्रमुख पंचायत समिती सालेकसा सोबत जिल्हा परिषद वरिष्ठ केंद्रीय प्राथमिक शाळा तिरखेडी चे मुख्याध्यापक माननीय श्री एस जी जाधव ,सोबत. शिक्षक समुधलाल कुंभरे,चेतन राठोड, निशांत रहांगडाले , मैना मोरे, शारदा चंद्रिकापुरे , लक्ष्मीकांत तुरकर व शाळा व्यवस्थापन समिती तिरखेडीचे अध्यक्ष माननीय विजयजी कटरे सर्व पालक वर्ग ग्रामस्थ , गावातील सगळ्या समिती चे सदस्य उपस्थित होते.शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्यातील नाटक व नृत्य यासारख्या कौशल्याचा वापर करून सर्व गावाला मनमोहित केले ..दुसऱ्या दिवशी 26 जानेवारीला ध्वजारोहण झाल्यावर वेशभूषेत थोर पुरुषांची गावात मिरवणूक काढण्यात आली व शेवटी बक्षीस वितरण करण्यात आले.या सर्व कार्यक्रमाला तिरखेडी गावातील पालकांनी उत्तुंग असा सहकार्य केला .