कुटुंब नियोजन शिबिरातील हलगर्जीपणामुळे 24 वर्षीय महिलेचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको आंदोलन

कुटुंब नियोजन शिबिरातील हलगर्जीपणामुळे 24 वर्षीय महिलेचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको आंदोलन



भंडारा: BHANDARA लाखांदूर: प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शिबिरात झालेल्या दोषपूर्ण शस्त्रक्रियेमुळे 24 वर्षीय मेधा बनारसे यांनी आपला जीव गमावला. दोन महिन्यांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये संताप उसळला असून, रविवारी राज्य महामार्गावर मेधा यांचा मृतदेह ठेवून संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले.


दोन मुलांची आई मृत्यूमुखी; आरोग्य प्रशासनावर गंभीर आरोप विस्ली (बु) येथील रहिवासी मेधा बनारसे यांनी 16 नोव्हेंबर रोजी सरांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शिबिरात शस्त्रक्रिया केली होती. मात्र, या शस्त्रक्रियेनंतर त्यांना गंभीर त्रास होऊ लागला. कुटुंबीयांनी आर्थिक संकटांवर मात करत विविध रुग्णालयांत उपचारासाठी धावाधाव केली. अखेर नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान 18 जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे दोन लहान मुले पोरकी झाली आहेत.


दोषींवर कारवाईची मागणी; संतप्त ग्रामस्थांचा - आक्रोशग्रामस्थ व कुटुंबीयांनी या दुर्दैवी घटनेमुळे दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. "मृत महिलेच्या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी आरोग्य विभागाने घ्यावी," अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. तसेच, दोषी डॉक्टरांचे निलंबन करून प्राथमिक आरोग्य केंद्रांतील गैरव्यवस्थापन थांबवावे, अशी मागणीही करण्यात आली.


प्रशासनाच्या निष्क्रियतेचा फटका - या प्रकरणी ग्रामस्थांनी 2 डिसेंबर रोजी उपोषण केले होते. मात्र, प्रशासनाने फक्त तात्पुरती नुकसानभरपाई देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. दोषींवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले असून, या घटनेमुळे आरोग्य केंद्रांतील व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


आरोग्य व्यवस्थेतील सुधारणा गरजेची- या घटनेने कुटुंब नियोजन शिबिरांतील हलगर्जीपणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. रुग्णांची सुरक्षा आणि शिबिरांतील वैद्यकीय प्रक्रियांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी सुधारणा करणे अत्यंत गरजेचे आहे. 

दोषींवर कारवाई व कुटुंबाला न्याय मिळावा, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!

Post a Comment

Previous Post Next Post