भाईजींनी आणलेला पालकमंत्री जिल्ह्याच्या विकासाचा नवा अध्याय उघडेल

 भाईजींनी आणलेला पालकमंत्री जिल्ह्याच्या विकासाचा नवा अध्याय उघडेल



गोदिया; GONDIA प्रफुल्ल पटेल यांच्या गृहजिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे वजन अधिक मजबूत झाले आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील राजकारणावर नेहमीच प्रभाव टाकणारे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, ज्यांना स्थानिक लोक "भाईजी" म्हणून संबोधतात, त्यांच्या इच्छेनुसार बाबासाहेब पाटील यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.गोंदिया-भंडारा जिल्ह्याचा राजकीय पाया नेहमीच पटेल यांच्या प्रभावाखाली राहिला आहे. "भाईजींचा शब्द म्हणजे निर्णय" असे स्थानिक नेत्यांपासून जनतेपर्यंत सर्वमान्य आहे. "जे पटेल चाहतील, तेच पालकमंत्री बनतील" हे विधान पुन्हा एकदा सत्य ठरले आहे. बाबासाहेब पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे महत्त्वाचे नेते असून, त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यात विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा आहे.बाबासाहेब पाटील यांची नियुक्ती केवळ औपचारिक निर्णय नसून प्रफुल्ल पटेल यांच्या सहमतीनेच झाली असल्याचे बोलले जाते. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे अधिक चुरशीची होतील. गोंदियातील मतदार अजूनही पटेल यांना प्रामाणिक नेतृत्व मानतात, आणि त्यांचा शब्दच जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरवतो, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

भाईजींचा प्रभाव आणि स्थानिक राजकीय वजन

गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी, ग्रामीण जनता आणि तरुणाईसाठी विकासकामांवर भर देण्यासाठी बाबासाहेब पाटील यांनी योजना आखण्यास सुरुवात केली आहे. सिंचन प्रकल्प, शेतकरी कल्याण, रोजगार निर्मिती आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली मोठे निर्णय घेतले जातील. मात्र, हे सर्व निर्णय प्रफुल्ल पटेल यांच्या मार्गदर्शनाखालीच होतील, याची खात्री आहे.भाईजींनी आणलेला हा पालकमंत्री जिल्ह्याच्या विकासाचा नवा अध्याय उघडेल, असा विश्वास जिल्ह्यातील जनतेला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post