आमगाव पंचायत समितीत निवडणुकीनंतर राजकीय वादळ, उपसभापतींचे अश्रू चर्चेत!

 आमगाव पंचायत समितीत निवडणुकीनंतर राजकीय वादळ, उपसभापतींचे अश्रू चर्चेत!



आमगाव पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडणुकीत योगिता यशवंत पुण्ड यांची सभापती, तर सुनंदा ऊके यांची उपसभापती म्हणून विनविरोध निवड झाली. राजकीय संघर्ष टाळून या निवडींमुळे पक्षांत आनंदाचे वातावरण होते. मात्र, निवडीनंतर माध्यमांसमोर आलेल्या सुनंदा ऊके यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहताना पाहून अनेक तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.सुनंदा ऊके यांना निवडणूक प्रक्रियेत विश्वासात घेतले गेले नव्हते का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पक्षश्रेष्ठी हे मत फेटाळत "आनंदाचे अश्रू" असल्याचे सांगत असले, तरी सुनंदा ऊके यांनी कोणतीही प्रतिक्रिया न दिल्यामुळे हा विषय अधिक चर्चेचा ठरतो आहे.सभापती योगिता पुण्ड यांनी विकासकामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मात्र, उपसभापतींच्या नाराजीचे संकेत पाहता समितीतील निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग किती असेल, याबद्दल प्रश्न निर्माण झाला आहे.


आगामी दिशा कोणती?

सभापती आणि उपसभापतींमध्ये समन्वय साधला गेला नाही, तर समितीच्या कामकाजावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. पंचायत समितीतील सत्तारूढ गटांमधील अंतर्गत मतभेदांच्या चर्चांमुळे सामान्य नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.सध्या तरी, या परिस्थितीला पक्षश्रेष्ठी कशा प्रकारे हाताळतात आणि समन्वय कसा साधतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post