ब्रह्मपुरीचे प्रांत अधिकारी पर्वणी पाटील यांना 'उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी' पुरस्कार



 ब्रह्मपुरीचे प्रांत अधिकारी पर्वणी पाटील यांना 'उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी' पुरस्कार


ब्रह्मपुरी   विधानसभा निवडणूक 2024 मध्ये उत्कृष्ट कामगिरी बद्दल नागपूर प्रशासकीय विभाग मधून राजस्तरीय उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुरस्कार प्राप्त झाला. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कारासाठी ब्रह्मपुरीचे प्रांत अधिकारी पर्वणी पाटील यांची निवड झाली आहे. राष्ट्रीय मतदारदिनी 25 जानेवारीला पुणे येथील राज्यस्तरीय कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती आहे. ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांत अधिकारी पर्वणी पाटील काम पाहिले. त्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल हा पुरस्कार मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने जाहीर केला आहे. त्याबद्दल सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी (तहसीलदार) व नायक तहसीलदार आणि सर्व कर्मचारी रुंद पुष्पगुच्छ देऊन प्रांत अधिकारी यांचे अभिनंदन केले. ‘निवडणुकीच्या काळात सर्व अधिकारी- कर्मचा-यांनी अविश्रांत परिश्रम घेऊन निवडणुकीची प्रक्रिया सुव्यवस्थितपणे पार पाडली. सर्वांच्या योगदानामुळे मला पुरस्कार प्राप्त झाला’, असे सांगून प्रांत अधिकारी-यांनी सर्व सहका-यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post