पोलीस ठाणे आमगांवची मोठी कारवाई – १६,१२,०००/- रुपयांचा अवैध गौण-खनीज माल जप्त



 पोलीस ठाणे आमगांवची मोठी कारवाई – १६,१२,०००/- रुपयांचा अवैध गौण-खनीज माल जप्त


गोंदिया, ०३ जानेवारी २०२५ – पोलीस निरीक्षक श्री. तिरुपती अशोक राणे यांच्या नेतृत्वाखाली आमगांव पोलीस ठाण्याने एक मोठी कारवाई केली आहे. ०३ जानेवारी २०२५ रोजी गुप्त माहितीच्या आधारे अवैध गौण-खनीज रेतीची वाहतूक करत असलेल्या दोन ट्रॅक्टरला अडवून पोलीसांनी तब्बल १६,१२,०००/- रुपयांचा माल जप्त केला.पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, वाधनदी पात्रातून मुंडीपार येथील मारबत घाटातून अवैध रेती उत्खनन व वाहतूक केली जात आहे. त्यानुसार, घाटटेमनी बीट परिसरात सापळा रचला गेला आणि दोन ट्रॅक्टर व ट्रॅली थांबवले.पहिल्या ट्रॅक्टरमधून ६,०००/- रुपये किमतीची एक ब्रास रेती, ७,००,०००/- रुपये किमतीचा ट्रॅक्टर, व १,५०,०००/- रुपये किमतीची ट्राली मिळून ८,५६,०००/- रुपये किमतीचा माल जप्त झाला. दुसऱ्या ट्रॅक्टरमधून ७,५६,०००/- रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या कारवाईत सात आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कडक कारवाईने अवैध गौण-खनीज उत्खनन व वाहतुकीच्या विरोधात एक मोठा संदेश दिला आहे.




Post a Comment

Previous Post Next Post