एमपीएससी परीक्षेत यश मिळवणाऱ्या कू प्रणया भालेकर चा सत्कार..!



 एमपीएससी परीक्षेत यश मिळवणाऱ्या कू प्रणया भालेकर चा सत्कार..!

आदर्श क. महाविद्यालयात वर्ग १२ वी विज्ञान चा निरोप समारंभ संपन्न

आमगाव २१ जानेवारी आदर्श कनिष्ठ महाविद्यालय आमगाव येथे विज्ञान विभागातर्फे वर्ग ११ वी कडून वर्ग १२ वी ला निरोप देण्यात आला. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात माजी विद्यार्थिनी व एमपीएससी परीक्षेत यश मिळविणाऱ्या कू प्रणया भालेकर हीचे सत्कार करण्यात आले.या समारोहात अध्यक्ष म्हणून प्राचार्य श्री डी एम राऊत व प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक श्री यू एस मेंढे होते व मार्गदर्शक म्हणून कू प्रणया भालेकर उपस्थित होत्या.दिनांक २१ जानेवारी ला संपन्न या समारोहात विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून कनिष्ठ महाविद्यालय बद्दल व आपल्या शिक्षकांबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली. काही विद्यार्थ्यांनी आपल्या गीतांच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. संपूर्ण कनिष्ठ महाविद्यालय तर्फे कू प्रणया भालेकर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मंचावर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक कू टी टी पटले, सौ वाय जी हलमारे,श्री वी टी भुसारी, श्री बाय जी कावळे, श्री वि टी भुसारी शिक्षक वृंद उपस्थित होते. कु प्रणया भालेकर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या यशस्वी भावी जीवनासाठी मार्गदर्शन केले व स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना कोणत्या अडचणी येतात या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी प्राचार्य डी एम राऊत व श्री यु एस मेंढे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे आयोजन, सूत्रसंचालन व आभार वर्ग ११ विच्या विद्यार्थ्यांनी केले. शेवटी वंदे मातरम् नी कार्यक्रमाची सांगता झाली व १२ वीच्या विद्यार्थ्यांना अल्पहार वाटप करण्यात आला.

या प्रसंगी विज्ञान विभागाचे सर्व विद्यार्थी व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post