शेतकऱ्याच्या गोठ्याला भीषण आग: गाय व वासरू जळून खाक, लाखोंचे नुकसान

 शेतकऱ्याच्या गोठ्याला भीषण आग: गाय व वासरू जळून खाक, लाखोंचे नुकसान



आमगाव: आमगाव शहरातील तुकडोजी चौक परिसरात राहणाऱ्या राधेश्याम कारंजेकर यांच्या गोठ्याला मध्यरात्री भीषण आग लागून एक गाय आणि वासरू जळून खाक झाले, तर आणखी एक गाय जखमी अवस्थेत सापडली. या आगीत सुमारे तीन लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे.शनिवारी मध्यरात्री ही दुर्घटना घडली. गोठ्याजवळील तनसीच्या ढिगाऱ्यामुळे आगीने उग्र रूप धारण केले. आग लागल्याचे लक्षात येताच शेजाऱ्यांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, आगीचे प्रमाण भीषण असल्याने आग विझवताना मोठी तारांबळ उडाली.


अग्निशमन दलाची दिरंगाई:

घटनेदरम्यान नगर परिषद अग्निशमन दलाला संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु त्यांचे फोन बंद होते, तर मुख्याधिकारी ‘ओन्ली फॉर एसएमएस’ असा संदेश पाठवत असल्याचे समोर आले. काही तासांनी अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी पोहोचली, परंतु पाण्याचा साठा आणि यंत्रणा निकामी असल्याने आग आटोक्यात आणण्यात अडचणी आल्या. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली.


नुकसानीचा आढावा:

या आगीत गोठ्याचे मोठे नुकसान झाले असून, सुमारे तीन लाख रुपयांची हानी झाली आहे. स्थानिक नेते आणि नागरिकांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने शासकीय मदत देण्याची मागणी केली आहे. प्रा. सुभाष आकरे, उत्तम नंदेश्वर आणि हुकूम बोहरे यांनी शासनाकडे या प्रकरणात हस्तक्षेप करून मदत देण्याची विनंती केली आहे

शहराच्या मध्यवर्ती भागात लागलेल्या आगीसाठी प्रशासनाने दाखवलेली निष्काळजीपणा गंभीर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. भविष्यात अशा घटना घडल्यास परिस्थिती किती भयावह होईल याची कल्पनाही करवत नाही. त्यामुळे अग्निशमन यंत्रणा सक्षम करण्याची मागणी जोर धरत आहे.पोलीस विभागाने घटनेची नोंद घेतली असून, नागरिकांमध्ये अजूनही संतप्त वातावरण आहे.


Post a Comment

Previous Post Next Post