विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छता आणि सुरक्षित वाहतुकीचा संदेश



विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छता आणि सुरक्षित वाहतुकीचा संदेश

आमगाव:विद्या निकेतन हायस्कूल आणि श्री जीवन गौरव फाउंडेशनच्या वतीने स्काऊट-गाईड व आरएसपीच्या विद्यार्थ्यांनी समाजापर्यंत स्वच्छता आणि सुरक्षित वाहतुकीचा संदेश पोहोचवण्यासाठी गांधी चौक, आमगाव येथे विशेष जनजागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून झाली. यानंतर आरएसपीच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक ड्रिल सादर केली. जनजागरणासाठी तयार करण्यात आलेल्या पत्रकाचे विमोचन तहसीलदार मोनिका कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पोलिस निरीक्षक टी. ए. राणे, पोलिस उपनिरीक्षक गीते, विद्या निकेतन हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. बी. भक्तवर्ती, शिक्षक आर. एस. वैष्णव आणि आर. टी. खोब्रागडे उपस्थित होते.
श्री जीवन गौरव फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भोला गुप्ता यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. फाउंडेशनचे उपाध्यक्ष मुरारी अग्रवाल, मधु शिवनकर आणि पंकज असाटी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी नागरिकांमध्ये जनजागरण पत्रकांचे वितरण करून स्वच्छता आणि सुरक्षित वाहतुकीचे महत्त्व पटवून दिले.


Post a Comment

Previous Post Next Post