सालेकसा: ट्रेनच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू
मायकल मेश्राम सालेकसा ; तालुक्यातील टोयागोंडी गावाजवळ गुरुवारी पहाटे दुर्दैवी घटना घडली. रेल्वे लाईन खांब क्रमांक ९४७/२७ जवळ एका सहा महिन्याच्या बिबट्याचा ट्रेनच्या धडकेने मृत्यू झाला.रेल्वे प्रशासनाने या घटनेची माहिती तत्काळ सालेकसा वनविभागाला दिली. पहाटे ४:३० वाजता वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा केला. नंतर मृत बिबट्याला सालेकसा येथे नेण्यात आले. वनविभागाने शवविच्छेदन करून नियमांनुसार बिबट्याचे अंत्यसंस्कार केले.घटनास्थळी वन परिक्षेत्र अधिकारी जी.एस. राठोड, वनपाल ब्राह्मणे, वनरक्षक बडोले, फुंदे चौकीदार, पोलीस पटेल बांबोळे आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.गोंदिया जिल्ह्याच्या जंगलमय भागात अशा घटना अधूनमधून घडतात. वन्यजीव संरक्षणासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून, नागरिकांनीही वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात
आले आहे.