गोंदियातील शिक्षकाला सायबर लुटारूंचा १३ लाखांचा गंडा, 'डिजिटल अरेस्ट'चा थरार
गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध येथील जवाहर नवोदय विद्यालयातील शिक्षक भोजलाल रामलाल लिल्हारे यांना सायबर फसवणुकीचा मोठा धक्का बसला आहे. "तुझ्यावर मुंबई-ठाण्यात एफआयआर दाखल आहे. तू डिजिटल अरेस्ट होऊ शकतोस," असे सांगत लिल्हारे यांच्याकडून तब्बल १३ लाख ४४ हजार रुपयांची रक्कम सायबर लुटारूंनी वसूल केली.फसवणूक इतकी प्रभावी होती की, लिल्हारे यांनी घाबरून स्वतःला तीन दिवस खोलीत डांबून 'डिजिटल अरेस्ट' सुद्धा दिला. ही घटना स्थानिक तसेच राज्यभरात खळबळ उडवणारी ठरली आहे.
सायबर लुटारूंनी कसे केले फसवणूक?
सायबर गुन्हेगारांनी प्रथमतः लिल्हारे यांना संपर्क साधून, त्यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल असल्याचा बनाव केला. त्यांनी लिल्हारे यांना अटक होऊ नये म्हणून मोठी रक्कम ऑनलाइन हस्तांतरित करण्यास भाग पाडले. घाबरलेल्या लिल्हारे यांनी त्यांचे वैयक्तिक तपशील आणि रक्कम गुन्हेगारांच्या ताब्यात दिली.
सायबर सुरक्षेचा इशारा:
ही घटना नागरिकांसाठी मोठा धडा आहे. सायबर फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. कोणतीही वैयक्तिक माहिती अज्ञात व्यक्तींना देण्याआधी सावधानता बाळगा.स्थानिक पोलीस यावर चौकशी करत असून आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. 'सायबर सुरक्षा' ही काळाची गरज आहे, अन्यथा अशा घटनांमुळे अनेक जण आपल्या कष्टाची कमाई गमावतील.