विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव – पिपरटोला खुर्द शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम

 विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव – पिपरटोला खुर्द शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम



आमगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिपरटोला खुर्द येथे सांस्कृतिक व स्नेह मिलन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच सौ. प्रमिलाताई मच्छीरके यांनी भूषवले, तर उद्घाटन नंदकुमार नेरकर (शालेय व्यवस्थापन समिती) यांच्या हस्ते झाले. उपसरपंच युवराज भेदे, अमरलाल लिल्हारे, प्रा. गणेश भदाडे, केंद्रप्रमुख एम. सी. मेळे, शाळेचे मुख्याध्यापक सुरेश कटरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात शारदा मातेच्या व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. मार्गदर्शक प्रा. गणेश भदाडे यांनी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांचे महत्त्व पटवून दिले. "विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास जितका महत्त्वाचा आहे, तितकाच मानसिक व शारीरिक विकासही आवश्यक आहे," असे सांगून त्यांनी स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी आत्मविश्वास वाढवण्याचा सल्ला दिला.विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य, पथनाट्य, तसेच समाजातील विविध विषयांवर जागृतीपर कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमादरम्यान मुख्याध्यापक बी. एस. केसाळे यांनी शाळेच्या गरजा व समस्या मांडल्या. यावर सरपंच प्रमिलाताई मच्छीरके यांनी शाळेला आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक डी. एच. टेंभरे, कोमल गिरडकर, अंगणवाडी शिक्षिका ललिता टेंभरे, रोहन लिल्हारे, प्रभाताई गिरडकर आणि शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांचे मोलाचे योगदान लाभले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन बी. एस. केसाळे यांनी केले.


Post a Comment

Previous Post Next Post