'वाह उस्ताद' प्रोमो गीत लॉन्च, केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य सोहळा
बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेता संदेश गौर यांचा 'वाह उस्ताद' या रिअॅलिटी शोचा प्रोमो गीत नुकताच लॉन्च करण्यात आला. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते या भव्य सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय दूरदर्शन, माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच सांस्कृतिक मंत्रालयाचा सहभाग होता.
भारतीय संगीत परंपरेला समर्पित 'वाह उस्ताद'
शास्त्रीय, अर्धशास्त्रीय आणि सूफी संगीताला समर्पित 'वाह उस्ताद' हा रिअॅलिटी शो भारतीय संगीत परंपरेचा जागर करणारा मंच आहे. या कार्यक्रमाचे आयोजन वेव्स ओटीटी शिखर संमेलन भारत अंतर्गत करण्यात आले. दिल्ली येथील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये आयोजित या कार्यक्रमाला दिग्दर्शक शेखर कपूर, प्रसार भारतीचे सीईओ गौरव द्विवेदी, अरुणिश चावला आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
संदेश गौर आणि सुजेन रेड्डीचा प्रोमो व्हिडिओ
अभिनेता संदेश गौर आणि अभिनेत्री सुजेन रेड्डी हे या प्रोमो व्हिडिओमध्ये झळकले आहेत. या गीताला मीट ब्रदर्स यांनी संगीतबद्ध केले असून गायक मनमीत सिंह यांनी ते गायले आहे. या प्रोमोमध्ये संदेश गौर हार्मोनियम, तबला आणि बासरी वाजवताना दिसत आहेत. तसेच दिल्ली घराण्याचे गायक वुसत इकबाल खान, मोहम्मद इमरान खान आणि उस्ताद इकबाल अहमद खान यांचाही सहभाग आहे.
'वाह उस्ताद' साठी ऑडिशन सुरू
या रिअॅलिटी शोसाठी ऑडिशन प्रक्रियेला सुरुवात झाली असून, इच्छुक गायक प्रसार भारती आणि वेव्स समिटच्या अधिकृत संकेतस्थळावर नावनोंदणी करू शकतात.
🔗 रजिस्ट्रेशन लिंक: prasarbharati.gov.in/wah-ustad/
📽️ प्रोमो व्हिडिओ पाहा:
Instagram |
Facebook |
YouTube