विद्यार्थ्यांनी दिला जल संवर्धनाचा संदेश.
लखमापूर येथे विविध स्पर्धांचे आयोजन.मृदा व जलसंधारण विभाग, तालुका कृषी विभाग कोरपना, पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत लखमापूर येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जि.प.उच्च प्राथमिक शाळा लखमापूर येथे शालेय विद्यार्थ्याकरिता जलसंवर्धन व पाणी व्यवस्थापन या विषयावर रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, व चित्रकला स्पर्धा यांसारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यांनी गावात प्रभात फेरी काढून प्रभात फेरीतून जलसंवर्धन व जंगल संवर्धनाचे महत्त्व नागरिकांना पटवून सांगितले.जलसंवर्धनाचे महत्त्व या विषयावर कृषी तज्ञ राजेंद्र बावणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांकरिता रांगोळी,निबंध, व चित्रकला यांसारख्या विविध स्पर्धा राबविण्यात आल्या. यावेळी कार्यक्रमाकरिता अतिथी म्हणून सरपंच अरुण जुमनाके, मुख्याध्यापक विनोद क्षीरसागर,कृषीतज्ञ राजेंद्र बावणे, रामटेके,पाणलोट सचिव चंपत राजुरकर, रोगे, सरोजताई अंबागडे, कल्पना ताई मडावी, प्रविना ताई टोंगे, संदीप बावणे, रोशन भोयर,मोरेश्वर उरकुंडे, करतार सिंग अलावत, साहेबराव चव्हाण,आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.