आमगाव ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सुविधांचा अभाव, उपजिल्हा रुग्णालयाची मागणी

 


आमगाव ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सुविधांचा अभाव, उपजिल्हा रुग्णालयाची मागणी

आमगाव :- गोंदिया जिल्ह्यातील आमगाव ग्रामीण रुग्णालयात वर्षाला सुमारे ८०,००० रुग्ण उपचार घेत असले तरी येथे आवश्यक आरोग्य सुविधा आणि कर्मचारी यांची कमतरता जाणवत आहे. तीन राज्यांच्या सीमेवर असलेल्या या रुग्णालयात मध्यप्रदेश व छत्तीसगडमधूनही रुग्ण येतात. मात्र, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि प्रशिक्षित मनुष्यबळाच्या अभावामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत आहे.रुग्णालयात सध्या सिटी स्कॅन, एक्स-रे, लॅब तपासणी यंत्रणा


 कार्यान्वित नाहीत. तसेच, शवविच्छेदन गृहाची दुरवस्था आणि कुचकामी यंत्रणा यामुळे नागरिकांत तीव्र असंतोष आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार रुग्णालयाच्या सेवेमध्ये सुधारणा होणे आवश्यक असून, येथे उपजिल्हा रुग्णालय उभारावे, अशी मागणी वारंवार करण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर भारतीय जनकल्याण फाउंडेशनने पुढाकार घेत राज्य सरकारकडे लेखी मागणी केली आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रा. इंजि. सुभाष आकरे, यशवंत मानकर, उत्तम नंदेश्वर, विक्की मानकर, योगेश मानकर आदींनी शासनाच्या दुर्लक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली. आमगाव तालुका केंद्र म्हणून महत्त्वाचे असून, येथे उपजिल्हा रुग्णालय उभारल्यास हजारो रुग्णांना तातडीने सेवा मिळू शकेल. त्यामुळे शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post