इस्लापूरमध्ये संत सेवालाल महाराज जयंतीचा जल्लोष; भव्य रॅलीने परिसर दणाणला!



 इस्लापूर परिसरात संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी .

किनवट बातमीदार .किनवट तालुक्यातील इस्लापूर सर्कल मधील प्रत्येक बंजारा तांड्यामध्ये संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निम्मीत्त भोगपूजा व मोटर सायकल रॉली काढुन मोठ्या थाटात जयंती साजरी करण्यात आली .दिनांक १५ रोजी इस्लापूर येथील संत सेवालाल महाराज चौकात व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरकरनगर येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत थोर पुरुष समाज सुधारक संत सेवालाल महाराज यांची २८६ वी जयंती साजरी करण्यात आली त्या निम्मीत्त इस्लापूर येथे महाराज यांच्या तैल चित्राची पूजा आर्चा करून अभिवादन करण्यात आले . तसेच परिसरातील परोटी तांडा , रोडानाईक तांडा,पांगरी तांडा , नंदगाव तांडा , तोटंबा तांडा , मार्लागुंडा तांडा ,अशा अनेक तांडात संत सेवालाल महाराज यांची समाजाच्या दरवर्षीच्या परंपरेनुसार प्रत्येक घरासमोर व मंदिरासमोर भोक पूजा करून जयंती साजरी करण्यात आली तसेच परिसरातील तरुण युवकाकडून संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती .

Post a Comment

Previous Post Next Post