आ. पुराम यांची जनता दरबार की फक्त औपचारिकता ?

 आ. पुराम यांची जनता दरबार की फक्त औपचारिकता - बालू वंजारी 



आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी 28 फेब्रुवारी रोजी सालेकसा, आमगाव आणि देवरी येथे जनता दरबार आयोजित केला आहे. प्रशासन व जनतेच्या संवादासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असला, तरीही यासाठी दिलेला वेळ पुरेसा आहे का, यावर नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.जनता दरबार की झटपट औपचारिकता? सालेकसा येथे 10 ते 12:30, आमगाव येथे 1 ते 2:30 आणि देवरी येथे 3 ते 6 या वेळेत होणाऱ्या या जनता दरबारांमध्ये इतक्या अल्प कालावधीत आमदार महोदय सर्वांच्या तक्रारी कशा ऐकणार आणि त्यावर काय उपाययोजना करणार, असा सवाल उपस्थित होत आहे.स्थानिक नागरिकांच्या मते, हा जनता दरबार म्हणजे केवळ औपचारिकता आहे. “कागदोपत्री कार्यक्रम घेऊन जनतेला आश्वासनांची पोकळ कवचकुंडले देण्यापेक्षा प्रत्यक्ष समस्या सोडवण्यासाठी आमदारांनी वेळ दिला पाहिजे,” असे अनेकांचे मत आहे.समस्यांच्या पर्वताला ‘दोन तास’ पुरेसे?अनेक नागरिक आपल्या गावातील मूलभूत समस्यांसाठी हजेरी लावणार आहेत—रस्ते, पाणीटंचाई, शेतीसंबंधी अडचणी, शासकीय योजनांचा अपुरा लाभ यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे. मात्र, इतक्या मोठ्या क्षेत्राच्या समस्या ऐकण्यासाठी आणि तत्काळ निर्णय घेण्यासाठी काही तासांचा वेळ खरोखरच पुरेसा आहे का?राजकीय रणनीती की लोकहित?निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे लोकप्रतिनिधी जनतेशी संवाद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, हा संवाद खरंच समस्या सोडवण्यासाठी आहे की निवडणुकीपूर्वी जनतेला खूश करण्याची रणनीती आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जनता दरबारांचा उपयोग केवळ फोटोसेशन व दिखावा करण्यासाठी होतो, असे आरोप देखील होत आहेत.नागरिकांचा वाढता रोष या दरबारांमध्ये किती लोकांना त्यांचे म्हणणे मांडता येईल आणि त्यावर तत्काळ कार्यवाही होईल का, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. “जर समस्या ऐकायच्याच नाहीत आणि त्यावर उपायही सुचवायचे नाहीत, तर अशा जनता दरबारांची गरजच काय?” असा रोष व्यक्त केला जात आहे.जनतेच्या अपेक्षा आणि आमदारांची जबाबदारी आमदार संजय पुराम यांच्यावर जनतेच्या अपेक्षा आहेत की, त्यांनी संपूर्ण कार्यकाळात लोकांसोबत वेळ घालवावा आणि त्यांच्या अडचणी सोडवाव्यात व जनता दरबाराची वेळ वाढवावी . जनता दरबार हा निव्वळ औपचारिकता न राहता, तो खऱ्या अर्थाने समस्यांचे समाधान करणारा ठरावा, हीच जनतेची मागणी आहे.आता पाहावे लागेल की, या वाढत्या विरोधाला उत्तर देण्यासाठी आमदार संजय पुराम यांची पुढील भूमिका काय राहते!



कार्यक्रम लोकांना फक्त समाधान देण्यासाठी ? - बालू वंजारी जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्ष

"जनता दरबार म्हणजे केवळ लोकांना भेटायचं आणि फोटोसेशन करायचं ठिकाण नाही, तर तो लोकांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी असला पाहिजे. सालेकसा, आमगाव आणि देवरीसाठी अवघे काही तास देऊन लोकांच्या मोठ्या समस्या सोडवल्या जातील का?", "जनता दरबार आयोजित करणं हे नक्कीच चांगलं आहे, पण त्यासाठी योग्य नियोजन आणि पुरेसा वेळ असणं गरजेचं आहे. इतक्या कमी वेळेत हजारो नागरिकांच्या समस्या कशा सोडवल्या जाणार? जर हा कार्यक्रम लोकांना फक्त तोंडदेखलं समाधान देण्यासाठी असेल, तर त्याचा काहीही उपयोग नाही!"

Post a Comment

Previous Post Next Post