हळदी कुंकू व सन्मान नारीशक्तीचा!

 


हळदी कुंकू व सन्मान नारीशक्तीचा!

स्वच्छ परिसर – निरोगी जीवन या संकल्पनेतून विशेष उपक्रम


 (नाशिक) – नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या वतीने आयोजित "सौभाग्याचे लेणी" हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सुमारे दीडशेहून अधिक महिलांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे, या हळदीकुंकवाच्या वाणासोबत महिलांना स्वच्छतेचा संदेश देणारी कचऱ्याची पेटी देण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात कर्नल मच्छिंद्र शिरसाठ यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहल देव यांनी "स्वच्छ सुंदर परिसर – जीवन निरोगी निरंतर" या संकल्पनेचा प्रचार करत महिलांना कचऱ्याच्या पेट्या भेट दिल्या. महिलांनीही याचा उत्स्फूर्त प्रतिसाद देत परिसर स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारली.यावेळी स्वावलंबी महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला. अभिनेत्री आणि सेल्फ-डिफेन्स ट्रेनर रूपाली पवार, मेकअप आर्टिस्ट आशा महाजन, ज्वेलरी मेकर भाग्यश्री कदम, सिनियर असोसिएट शीतल राजेंद्र पाटील, अरिहंत टुर्सच्या सपना जैन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत कार्यक्रमादरम्यान वृक्षारोपणही करण्यात आले. महिलांनी स्वतः झाडे लावून "वृक्ष लावा, पावलोपावली सावली मिळवा" हा संदेश दिला.कार्यक्रमास इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार हिरामण दादा खोसकर यांचे पुतणे भास्कर भाऊ खोसकर, माजी सरपंच रोहिदास भाऊ कातोरे, विविध कार्यकारी सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन दत्ताभाऊ कातोरे, तसेच अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.हा उपक्रम महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरला.


Post a Comment

Previous Post Next Post