रुग्णाला वाचवण्यासाठी स्वतः धावून गेले मुख्यमंत्री मरापे


सुमित ठाकरे नागपूर – धनवटे नॅशनल कॉलेज करिअर कट्टा चे मुख्यमंत्री आदेश मरापे यांनी स्वतः रक्तदान करून नागपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल असलेल्या एका रुग्णाचा जीव वाचवला. त्यांच्या या संवेदनशील कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.रितेश उईके (वय – २७), यांना गंभीर आजारामुळे नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांना दुर्मिळ रक्तगटाचे रक्त लागले. मात्र, रक्तपेढ्यांमध्ये आवश्यक रक्त उपलब्ध नव्हते. कुटुंबीयांनी रक्त मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण कुठेही रक्त मिळाले नाही.ही माहिती मुख्यमंत्री आदेश मरापे यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी सुद्धा महिती काडली पन रक्तसाठा उपलब्ध नसल्याने त्यांनी वेळ न दवडता स्वतः रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. ते तातडीने नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली रक्तदान केले.मुख्यमंत्र्यांच्या रक्तदानामुळे तातडीने उपचार सुरू करता आले आणि रुग्णाची प्रकृती सुधारू लागली. डॉक्टरांनीही याची पुष्टी केली की, वेळेत रक्त न मिळाल्यास परिस्थिती गंभीर बनली असती. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचे नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होत आहे. रक्तदान हा एक छोटा पण महत्त्वाचा सामाजिक उपक्रम आहे, याचे महत्त्व त्यांच्या कृतीने अधोरेखित झाले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे समाजात सकारात्मक संदेश गेला आहे आणि अनेक युवक रक्तदानासाठी पुढे सरसावत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post