उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आमगाव येथे साई चरणी प्रार्थना
आमगाव, : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख मा. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आमगाव येथे त्यांच्या दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी साई चरणी विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रजी नायडू, महिला जिल्हाप्रमुख माया ताई शिवणकर तसेच अनेक शिवसैनिकांनी या भक्तिमय कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
श्री साईबाबा मंदिरात पार पडलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात साईबाबांच्या मंगल आरतीने झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आरोग्य, यश आणि दीर्घायुष्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख सुरेंद्रजी नायडू म्हणाले, "मा. एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्राच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यांच्या नेतृत्त्वामुळे
राज्यातील अनेक गोरगरीब जनतेला न्याय मिळत आहे. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आम्ही साई चरणी प्रार्थना केली आहे."महिला जिल्हाप्रमुख माया ताई शिवणकर म्हणाल्या, "शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अधिक बळकट होत आहे. त्यांनी महिलांसाठी, युवकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यांच्या
उत्तम आरोग्यासाठी आम्ही सर्वजण मनःपूर्वक प्रार्थना करत आहोत."या वेळी "जय श्रीराम! जय शिवराय!" च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमाच्या शेवटी प्रसादाचे वाटप करण्यात आले. शिवसेनेच्या या उपक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण होते.