एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे म्हणजे वाहनधारकांसाठी शिक्षा!

 एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे म्हणजे वाहनधारकांसाठी शिक्षा!



अपॉइंटमेंट असूनही तासन्-तास प्रतीक्षा, गैरव्यवस्थेमुळे वाहनधारक त्रस्त

भंडारा : वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) बंधनकारक केल्यानंतर वाहनधारकांचा त्रास वाढला आहे. ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतल्यानंतरही त्यांना तासनतास वाट पाहावी लागत आहे. सुविधांचा अभाव, कर्मचाऱ्यांची कमतरता आणि असहकारामुळे वाहनधारकच सेंटरवर कामगार बनले आहेत!

➡️अपॉइंटमेंट घेऊनही ताटकळत वाहनधारक!

ऑनलाइन अपॉइंटमेंट घेतली तरी वेळेवर नंबर प्लेट बसवली जात नाही. अनेक जण ठरलेल्या वेळेत पोहोचतात, पण प्रत्यक्षात काम सुरू होईपर्यंत तासन्-तास उभे राहावे लागते. "आमच्याकडे कर्मचारी कमी आहेत, थांबा किंवा परत या," असा सरळ शब्दांत सल्ला दिला जातो. त्यामुळे वाहनधारकांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे.


➡️ सेंटरवर गोंधळाचे वातावरण, सुविधा नाहीत!

सेंटरवर छायेसाठी व्यवस्था नाही, बसण्यासाठी जागा नाही, दिशादर्शक फलक नाहीत, आणि माहिती देण्यासाठी जबाबदार अधिकारीही नाहीत. वाहनधारकांना आपल्या वाहनाचा नंबर पुन्हा पुन्हा विचारून शोधावे लागते. काही वेळा "तुम्हीच जुन्या प्लेट काढा" असा सल्ला दिला जातो, कारण कर्मचारी मदतीला येत नाहीत.


➡️ वाहनधारकच बनले कामगार!

कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे वाहनधारकांना स्वतःच काम करावे लागत आहे. जुनी नंबर प्लेट काढणे, नवी प्लेट लावण्यासाठी मदत करणे – हे सर्व काम वाहनधारकच करत आहेत. काही वेळा कर्मचारी नवीन प्लेट देऊन निघून जातात, त्यामुळे वाहनधारकांनीच प्लेट व्यवस्थित बसवायची जबाबदारी उचलावी लागते.


➡️ RTO कुठे आहे? कारवाई होणार का?

वाहनधारकांनी तक्रार करावी, चौकशी करून कारवाई करू, असे आश्वासन आरटीओ विभागाकडून देण्यात आले आहे.


"वाहनधारकांच्या तक्रारींची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल."

राजेंद्रकुमार वर्मा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, भंडारा


प्रशासन झोपेत की दुर्लक्ष जानूनबुजून?

गैरव्यवस्थेमुळे वाहनधारक हैराण आहेत, पण या अव्यवस्थेचा दोष कुणाकडे? अपॉइंटमेंट असूनही तासनतास प्रतीक्षा का? कर्मचाऱ्यांचा अभाव का? या गोंधळावर प्रशासन कधी लक्ष देणार? की वाहनधारकांचाहा संघर्ष असाच सुरू राहणार?


Post a Comment

Previous Post Next Post