सालेकसा येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा

 सालेकसा येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा



सालेकसा (09 मार्च 2025) – सालेकसा तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सहसरामभाऊ कोरोटे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रजी नायडू होते.याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख सौ. मायाताई शिवणकर, वरिष्ठ शिवसेना कार्यकर्ते मा. राजिकजी खान, जिल्हा समन्वयक हिरालालजी साठवणे, तालुका समन्वयक संजूभाऊ देशकर, शिवसेना तालुका प्रमुख विजयभाऊ नागपुरे, युवासेना तालुका प्रमुख मायकलजी मेश्राम, आदिवासी नेते अनिलजी सोयाम, डॉ. सुनीलजी पगरवार, महिला तालुका प्रमुख सौ. मीनाक्षीताई फुंडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात महिलांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात आला आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यांना शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक सहसरामभाऊ कोरोटे यांनी महिलांच्या हक्कांवर आणि सामाजिक योगदानावर भाष्य करत, त्यांना संघटित होण्याचे आवाहन केले.या प्रसंगी सौ. योगिता ताई असाटी, सौ. नेहा ठाकरे, सौ. आचल मेश्राम, सौ. डॉ. अंजली पांडे, सौ. उषा वाघाडे, सौ. संतोषी चुटे, सौ. सुनिता सिंघानिया, सौ. सुशिला फुंडे, सौ. रीना तीराले यांची विशेष उपस्थिती होती.कार्यक्रमाला सालेकसा तालुक्यातील आणि शहरातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका सलागर समितीचे संदीप दुबे यांनी विशेष मेहनत घेतली आणि आभार मानले.


Post a Comment

Previous Post Next Post