२५०० रुपयांची लाच घेताना लेखा परीक्षक संजय बोकडे एसीबीच्या जाळ्यात

२५०० रुपयांची लाच घेताना लेखा परीक्षक संजय बोकडे एसीबीच्या जाळ्यात



गोंदिया–शिक्षण विभागातील लेखा अधिकारी(वर्ग २)व लेखा परीक्षक संजय रामभाऊ बोकडे(वय ४९)यांना २५०० रुपयांची लाच स्वीकारताना गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(ACB)रंगेहात अटक केली.

फर्यादी हे लोकसेवा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोसमटोली(सडक अर्जुनी)येथे मुख्याध्यापक असून,त्यांच्या शाळेत परिचर म्हणून कार्यरत असलेले भीमराव रंगारी यांचे डिसेंबर २०२४ मध्ये निधन झाले.त्यांच्या सेवेनुसार प्रगती योजना व इतर लाभ निश्चित करण्यासाठी संपूर्ण दस्तऐवज आरोपीकडे सोपविण्यात आले होते.

संबंधित वेतन निश्चित करून त्याची पडताळणी करण्यासाठी बोकडे यांनी ३,००० रुपयांची लाच मागितली होती.मात्र,फर्यादीने लाच न देता तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार,गोंदिया ACB कार्यालयात तक्रार नोंदवून सापळा रचण्यात आला.

२४ मार्च रोजी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष सापळा रचून,फर्यादीकडून २५०० रुपयांची लाच स्वीकारताना आरोपी संजय बोकडे यांना रंगेहात पकडले.त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून,गोंदिया शहर पोलिस ठाण्यात आरोपीला दाखल करण्यात आले.त्यांच्याकडून ३५,५०० रुपये रोख रक्कम आणि सॅमसंग कंपनीचा मोबाइल जप्त करण्यात आला.

एसीबी पथकाने आरोपीच्या निवासस्थानीही झडती सुरू केली आहे.ही कारवाई पोलिस अधीक्षक(ACB)नागपूर डॉ.दिगंबर प्रधान,अपर पोलिस अधीक्षक सचिन कदम,संजय पुरदरे यांच्या मार्गदर्शनाखाली,उपअधीक्षक विलास काडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक राजीव कर्मलवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडली.


Post a Comment

Previous Post Next Post