जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांची आरोग्य केंद्राला अचानक भेट – कर्मचार्‍यांच्या हजेरी नोंद नसल्याने चांगलेच संतापले

 जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांची आरोग्य केंद्राला अचानक भेट – कर्मचार्‍यांच्या हजेरी नोंद नसल्याने संताप



गोंदिया : तिरोडा तालुक्यातील ग्राम सुकळी/डाकराम येथील आयुष्मान आरोग्य मंदिर प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती सुरेश हर्षे यांनी अचानक भेट दिली. या भेटीदरम्यान, कर्मचारी ओपीडीमध्ये कार्यरत असतानाही त्यांच्या हजेरीची नोंद झाली नव्हती. हा प्रकार पाहून त्यांनी संताप व्यक्त केला आणि जबाबदार अधिकाऱ्यांना जाब विचारला.



हजेरी नोंद नसल्याने नाराजी सुरेश हर्षे आरोग्य केंद्रात पोहोचताच त्यांनी कर्मचार्‍यांची उपस्थिती तपासली. मात्र, कर्मचारी कामावर असतानाही त्यांच्या हजेरीची नोंद करण्यात आलेली नव्हती. यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. सरकारी आरोग्य केंद्रातील कर्मचारी वेळेवर उपस्थित राहतात का, त्यांची हजेरी नीट नोंदवली जाते का, याची जबाबदारी व्यवस्थापनाने गांभीर्याने घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

कर्मचाऱ्यांना सूचना – नियमानुसार हजेरी नोंदवा आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यांनी आपल्या उपस्थितीची बायोमेट्रिक अथवा रजिस्टरमध्ये वेळेवर नोंद करावी, अन्यथा गैरहजेरीच्या स्वरूपात चुकीचा समज होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.त्यांच्या या दौऱ्यानंतर आरोग्य केंद्र प्रशासन अधिक जागरूक झाले असून, भविष्यात अशा त्रुटी टाळण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post