जि प वरिष्ठ केंद्रीय प्राथमिक शाळा तिरखेडी येथे गुढी पाडवा प्रवेश वाढवा उत्सव साजरा
सालेकसा: आज जिल्हा परिषद वरिष्ठ केंद्रीय प्राथमिक शाळा तेरखेडी येथे गुढीपाडवा प्रवेश वाढवा या क्रमांतर्गत वर्ग पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक एस जी जाधव सर यांनी पालक व विद्यार्थ्यांना शाळेच्या कामगिरीविषयी माहिती दिली..
मनोगत व्यक्त करत असताना त्यांनी पालकांना असा विश्वास दिला की आज तुम्ही आपल्या पाल्याचा या शाळेत प्रवेश करून जो विश्वास दाखवला त्या विश्वासाची परतफेड नवोदय परीक्षा त्यांना पास करून देणार असा आत्मविश्वास शाळेचे कार्यक्षम मुख्याध्यापक एस जी जाधव सर यांनी व्यक्त केला...
या प्रसंगी गावाच्या कार्यक्षम सरपंचा मा प्रियाताई शरणागत,सर्व पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विजय भाऊ कटरे , राजेश भाऊ खोब्रागडे तसेच सर्व सदस्य व शाळेचे सर्व शिक्षक श्री चेतन राठोड सर, श्री निशांत रहांगडाले सर, मैना मोरे मॅडम, कुंभरे सर, तुरकर सर, आदी जण उपस्थित होते