"थकीत निधी द्या, अन्यथा आत्मदहनाची परवानगी द्या!" – ‘प्रहार’चा प्रशासनाला थेट इशारा
गोंदिया : तिरोडा"काम पूर्ण, पण पैसे मिळाले नाहीत!" – जिल्हा परिषदेच्या दिरंगाईमुळे ७६ विकासकामांचा ३३% निधी अद्याप थकीत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन डोळेझाक करत असल्याने ‘प्रहार जनशक्ती पक्ष’ने आक्रमक भूमिका घेतली आहे. "७ एप्रिलपर्यंत निधी मिळाला नाही, तर जिल्हा परिषद दालनात आत्मदहन करू!" असा थेट इशारा जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी दिला आहे.
निवेदनात संतापाचा सूर!
भांडारकर यांनी राष्ट्रपतींच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. "काम झाले, निधी मंजूर आहे, तरी अधिकाऱ्यांची चालढकल सुरू आहे. पुरवठादारांसाठी ही आर्थिक गळचेपी आहे. जर निधी वेळेत मिळाला नाही, तर आत्मदहनाशिवाय पर्याय उरणार नाही."
प्रशासनाच्या दिरंगाईचा फटका
ग्रामपंचायतींनी मंजूर कामे पूर्ण केली, मात्र चार वर्षांपासून पुरवठादार आणि ठेकेदार निधीसाठी वणवण फिरत आहेत. यामुळे अनेक जण आर्थिक संकटात सापडले असून, कर्जाचा डोंगर वाढत आहे.
७ एप्रिलला ठिणगी पेटणार?
"जर ७ एप्रिलपूर्वी निधी दिला नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन करू. प्रशासनाने वेळ न घालवता त्वरित कारवाई करावी!" – असा स्पष्ट इशारा भांडारकर यांनी दिला आहे.
Kon ho ha bhandarkar , purn nav kay kshachi nidhi
ReplyDelete