धनंजय मुंडेंचा राजीनामा: अखेर नैतिकतेचा विजय! अजित पवारांची संतुलित प्रतिक्रिया

 

धनंजय मुंडेंचा राजीनामा: अखेर नैतिकतेचा विजय! अजित पवारांची संतुलित प्रतिक्रिया



मुंबई; बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मोठा राजकीय भूकंप झाला आहे. तब्बल ८० दिवसांच्या संघर्षानंतर अखेर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या निकटवर्तीय वाल्मिक कराड याचे या हत्याकांडात प्रमुख सूत्रधार म्हणून नाव समोर आल्यानंतर विरोधकांसह जनतेनेही मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय!

धनंजय मुंडे यांनी त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला, आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी तो तत्काळ स्वीकारून पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे.

अजित पवारांचा शांत प्रतिसाद

या संपूर्ण घडामोडींवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अत्यंत संतुलित प्रतिक्रिया दिली. त्यांनी फक्त दोनच वाक्यांत आपली भूमिका स्पष्ट करत म्हटले –
"धनंजय मुंडे यांनी नुकताच त्यांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी नैतिकतेच्या आधारावर हा निर्णय घेतला आहे."

देशमुख हत्या प्रकरणाचा तपास आणि जनतेचा रोष

सीआयडीने या प्रकरणात १,२०० पानी दोषारोपपत्र दाखल केले असून, आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली असली तरी, एक आरोपी अद्याप फरार आहे. या घटनेचे काही काळजाला चिरणारे फोटो समोर आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती.

न्याय होणार की राजकीय नाट्य वाढणार?

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आता पुढील राजकीय हालचालींवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. हा फक्त एक राजीनामा आहे, की मोठ्या कारवाईची सुरुवात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे!

Post a Comment

Previous Post Next Post