आमगावमध्ये भीम गर्जना संघटनेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी नगर रॅली, प्रतिमा स्थापना व सत्कार सोहळा
आमगाव (१३ एप्रिल) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आमगाव येथे भीम गर्जना सार्वजनिक संघटनेच्यावतीने भव्य बाईक रॅली, प्रतिमा स्थापना आणि सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा संपूर्ण कार्यक्रम अतुल चव्हाण, निखिल मेश्राम,व अमन नागभिडे यांच्या मार्गदर्शनात यशस्वीपणे पार पडला.
रॅलीने संपूर्ण आमगाव नगरपरिसरात संविधानिक मूल्यांचा जागर केला. रॅलीनंतर आमगाव रेल्वे स्थानकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची स्थापना करण्यात आली. ही प्रतिमा अमन नागभिडे यांनी संघटनेस भेट दिली, ज्यामुळे त्यांचे सामाजिक योगदान अधोरेखित झाले.
कार्यक्रमात एक विशेष क्षण म्हणून आमगाव रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्टर राजेश भीमकर यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या सहकार्यभावनेबद्दल संघटनेच्यावतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमात अतुल चव्हाण, अमन नागभिडे, निखिल मेश्राम, मोहित मेश्राम, अजय बोरकर, आदित्य मेश्राम, सौरभ नांदेकर, बलवान गणवीर, अविनाश साखरे,भुवन साखरे, सुनील राऊलकर, श्रीयाश गोडाणे आणि नरेश मेश्राम यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले.
या उपक्रमाच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार करण्यात आला. भीम गर्जना संघटनेच्यावतीने झालेला हा उपक्रम उत्साहात व यशस्वीपणे पार पडला.