बांधकाम कामगारांसाठी मोठा दिलासा! आता ६० वर्षांनंतर मिळणार ‘निवृत्तिवेतन’
गोंदिया – मेहनतीचं चीज झालं! गोंदिया जिल्ह्यातील हजारो नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने ऐतिहासिक निर्णय घेत, आता ६० वर्षांनंतर कामगारांना दरवर्षी निवृत्तिवेतन देण्याची घोषणा केली आहे.वृद्धापकाळात दिलासा – थेट खात्यावर पैसे!या योजनेत नोंदणी कालावधीनुसार निवृत्तिवेतन मिळणार आहे:
१० वर्षे नोंदणी: दरवर्षी ₹६,०००
१५ वर्षे नोंदणी: दरवर्षी ₹९,००0
२० वर्षे व अधिक: दरवर्षी ₹१२,०००
पैसे थेट कामगाराच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत.
नोंदणी करा – लाभ मिळवा!
योजनेचा लाभ घेण्यासाठी www.mahabocw.in या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करता येईल. तसेच जिल्ह्यातील सेतू केंद्रांमध्येही नोंदणीसाठी सुविधा उपलब्ध आहे.
फक्त निवृत्तिवेतनच नव्हे, इतरही फायदे!
नोंदणीकृत कामगारांना मिळतात – सुरक्षा पेटी संच, अपघात विमा, घरकुल योजना, शिष्यवृत्ती आणि बरेच काही!
गोंदियात ९८ हजार कामगार नोंदणीकृत!
सध्या गोंदियात ९८,००० कामगारांची नोंदणी असून, ४०,००० हून अधिक कामगार सक्रिय आहेत. दरवर्षी ही संख्या वाढतेय – कारण शासनाच्या योजना आता थेट कामगारांच्या हक्कासाठी!
हा निर्णय म्हणजे केवळ योजना नव्हे, तर कामगारांच्या श्रमाचा सन्मान आहे!