महाराष्ट्र पत्रकार संघ, आमगावतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मट्ठा वितरण
आमगाव, ता. १४ एप्रिल –डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र पत्रकार संघ, आमगावच्या वतीने मट्ठा वितरणाचा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलिस निरीक्षक टी. ए. राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य संपर्क प्रमुख भोला गुप्ता, चंद्रमणी बौद्ध विहार समितीचे सचिव महेंद्र मेश्राम, रिसामा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच रवि क्षीरसागर, प्रख्यात व्यवसायी राजेश अग्रवाल, गोशाला सेवा समिती, धानोलीचे अध्यक्ष श्यामू मेश्राम, प्रशांत रावते आणि पिकेश शेंडे यांची उपस्थिती लाभली.
उपस्थित समाजबांधवांनी मट्ठ्याचा भरभरून आनंद घेत कार्यक्रमाची स्तुती केली. संघाचे अध्यक्ष जितेंद्र पटले यांनी उपस्थित अतिथींचे स्वागत केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा उपाध्यक्ष डी. के. भगत, तालुका उपाध्यक्ष नरेंद्र निखारे, सहसचिव नरेश बोपचे, प्रचारप्रमुख मनोज भालाधरे यांच्यासह राकेश रामटेके, हेमंत शर्मा, राजेश मानकर आणि संजू खोटोले यांचे योगदान लाभले.
कार्यक्रमाचे संचालन अध्यक्ष जितेंद्र पटले यांनी केले तर आभार प्रदर्शन संजू खोटोले यांनी मानले.हा उपक्रम सामाजिक सलोखा आणि बंधुता वृद्धिंगत करणारा ठरला.